गोंदिया जिल्हा हा महाराष्ट्र राज्याच्या ईशान्य दिशेला असुन उत्तर-पूर्व बाजूला मध्य प्रदेश व छत्तीसगढ राज्याच्या सीमा आहेत. गोंदिया जिल्हा पूर्वी भंडारा जिल्ह्याचा एक भाग होता. भंडारा जिल्ह्यातून दिनांक: 1 मे, 1999 रोजी विभागणी होवून गोंदिया जिल्ह्याची निर्मिती झाली असून जिल्ह्याचे क्षेत्रफळ 5,431चो.कि.मी. असुन सन 2011 नुसार लोकसंख्या ही 13,22,560 असुन आदिवासी समुदायाची लोकसंख्या 2,14,253 इतकी असुन त्यांची टक्केवारी 16.20 आहे. गोंदिया जिल्ह्यात प्रामुख्याने गोंड, हलबी, कवर, परधान या अनुसूचित जमाती लोकांचे वास्तव्य आहे. भात, ज्वारी, तेलबिया, गहू व तूर ही मुख्य पिके आहेत. वैनगंगा ही मुख्य नदी आहे. जिल्ह्यात धान उत्पादन जास्त होत असल्यामुळे हा जिल्हा तांदुळ उत्पादक जिल्हा (राईस सिटी) म्हणून ओळखला जातो.
जिल्ह्यातील आदिवासी समुदायाची स्वत:ची पारंपारिक संस्कृती आहे. आदिवासी लोक "पर्सा पेन" या देवाची उपासना करतात. "रेला" हे नृत्य आदिवासी समुदायात लोकप्रिय नृत्य आहे. Read more.